औरंगाबाद : कार भाड्याने घेऊन एकाची फसवणूक | पुढारी

औरंगाबाद : कार भाड्याने घेऊन एकाची फसवणूक

औरंगाबाद : मारुती स्विफ्ट कार भाड्याने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अमान साहिल शहाबुद्दीन शेख (रा. शहाबाजार) असे आरोपीचे नाव आहे.

सगीर बशीर सय्यद (रा. सावंगी हर्सूल) यांनी 23 मे रोजी शेख अमान याला कार भाड्याने दिली होती. याबाबत करारनामाही करून घेतला. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. संशय आल्याने सगिर यांनी कारची चौकशी केली असता शेख अमान याने यासीन नावाच्या इसमाकडे 40 हजार रुपये घेऊन कार गहाण ठेवली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सगीर याने तक्रार दिली.

Back to top button