औरंगाबाद: उपवास सोडण्यासाठी भगर खाल्ल्याने १२ महिलांना विषबाधा | पुढारी

औरंगाबाद: उपवास सोडण्यासाठी भगर खाल्ल्याने १२ महिलांना विषबाधा

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवानिमित्त उपवास केलेल्या महिलांनी उपवास सोडण्यासाठी भगर खाल्ली. त्यातून विषबाधा होऊन १२ महिलांना मळमळ, उलट्या, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यापैकी ८ महिलांची तब्येत अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती डॉ. प्रवीण पवार यांनी दिली.

कविता बळीराम राठोड (वय 45), निकिता बळीराम राठोड (वय 18, दोन्ही रा. मुंडवाडी तांडा), अनिता तानाजी अहिरे (वय 45 रा. नांदगिरवाडी), शालुबाई बाबुराव घुले (वय 35, रा. चिंचखेडा), पूर्णा अशोक जाधव (वय 35, रा. बोलटेक तांडा), छल्लीबई नारायण जाधव (वय 45, रा. बोलटेक तांडा), मालताबाई जगन्नाथ बोर्डे (वय 35, रा. बनशेंद्रा), सुनिता साईनाथ बोर्डे (वय 35, रा. जैतापुर), कांताबाई भागिनाथ जेठे (वय 35, रा. जैतापुर), निर्मला संजय काळे (वय 36, बिबखेडा), सोनाली ज्ञानेश्वर थोरात (वय 40, रा. कारखाना) या महिलांना भगर खाल्ल्यानंतर चक्कर येऊन उलट्या, मळमळ होणे आदी त्रास सुरू झाला.

या महिलांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी कविता राठोड, निकिता राठोड, बाळासाहेब अहिरे, शालुबाई घुले, पूर्णा जाधव, चलीबाई जाधव, भागुबाई बोर्डे या आठ महिलांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सुनिता साईनाथ कोरडे, कांताबाई भागिनाथ जेठे, निर्मला संजय काळे यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी, डॉ. प्रवीण पवार, डॉ. रुपेश माटे, परिचारिका स्वाती डोळस उपचार करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button