औंरगाबाद : चनकवाडी येथील ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

औंरगाबाद : चनकवाडी येथील ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा शुक्रवारी रात्री गळफास घेऊन मृत्यू झाला. यानंतर सदरील मृतदेह शनिवारी (दि.२७ ) रोजी सकाळी नातेवाईकांनी परस्पर रुग्णालयात आणल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करून अधिक तपास सुरू केला आहे. सुभाष जनार्दन कानुले (वय ३५, रा.चनकवाडी ता.पैठण) असे मृत युवकांचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील सुभाष जनार्दन कानुले या युवकांने घराच्या परिसरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी उघडकीस आली. सदरील घटनेची माहिती पोलिसांना न देताच कुटुबियांनी परस्पर मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना समल्यानंतर त्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना दिली. यानंतर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली.

सदरील युवकाचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय प्रथमदर्शनी पोलिसांनी व्यक्त केला. यानंतर पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सदरील युवकाने आत्महत्या का केली? आणि पोलिसांना माहिती न देताच सुभाषचा मृतदेह परस्पर कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात कसा आणला? याबाबतचा तपास सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत या घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button