औरंगाबाद : भवानीनगरात टोळक्याची तुफान दगडफेक
औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : घरासमोरील ओट्यावर बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून टोळक्याने भवानीनगरात तुफान दगडफेक केली. तुफान दगडफेक झाल्यामुळे दोन गट समोरासमोर आले. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.
- टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णनेम साधणाऱ्या अवनी लेखारा बद्दल हे माहित आहे का ?
- जत (जि. सांगली) : शेतकरी हतबल; महामार्गावर ओतला दीड टन टोमॅटो
ओट्यावर बसण्यास मज्जाव केल्याने कृत्य
गल्ली नं. ६ येथे दादा कॉलनीतील काही टवाळखोर ओट्यावर बसून सिगारेट ओढत महिलांची छेड काढत होते. यावर त्यांना बसण्यास मज्जाव केला असता टोळक्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली.
- बाळूमामाच्या नावानं चांगभलं : ‘मनोहर भोसलेचा फोटो काढा; अन्यथा मालिका बंद पाडू’
- टोकियो पॅरालिम्पिक : अवनी लेखारा हिची ‘सुवर्ण’ कामगिरी
या घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात प्रचंड तणाव असल्याने पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक मनोज बल्लाळ, राजेश जाजू, बळीराम देशमाने, विकास लूटे, अशोक महानोर, गणेश काथार, करण कपूर आदी उपस्थित होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची सूचना केली.
हेही वाचलं का ?
- Krishna Janmashtami : भागवतातील श्रीकृष्ण जन्मोत्सव
- मुंबईत ९७% लाेकांनी केली कोरोनावर मात!
- ज्यो बायडेन म्हणाले ड्रोन स्ट्राईक शेवटचा समजू नका
- विवाहानंतर नॉमिनेशन बदललंय ना; नियम काय सांगतात?
- विवाह समारंभाला न आलेल्या पाहुण्यांना वधूनेच पाठविले खर्चाचे बिल