औरंगाबाद: ३७५ मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी काढली रॅली | पुढारी

औरंगाबाद: ३७५ मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी काढली रॅली

बिडकीन; पुढारी वृत्तसेवा: यंदा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या निमित्त देशात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. स्वातंत्र्य सप्ताहाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात तिरंगा लावण्यात येणार आहे. अनेक शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी तिरंगा रॅली काढताना पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत असलेल्या बिडकीन शहरात एक आगळीवेगळी तिरंगा रॅली काढण्यात आली. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील किलबिल प्राथमिक शाळा व एचपीएल विद्यालयातर्फे ३७५ मीटरचा ध्वज तयार करत रॅली काढण्यात आली. यावेळी औरंगाबाद-पैठण रोडवरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button