दानवे यांना काळं दिसणार नाही म्हणून पाढरं फासणार : विलास औताडे | पुढारी

दानवे यांना काळं दिसणार नाही म्हणून पाढरं फासणार : विलास औताडे

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा :

पक्षनेते राहुल गांधींवर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिका करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना काळं दिसणार नाही, म्हणून पाढरं फासणार.. असा इशारा काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी शनिवारी (दि.२१) गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत दिला.

औताडे म्हणाले, भाजपचे मंत्री कायमच गांधी घराण्याविषयी गरळ ओकत आले आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा हे आहेत. देशात बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकरी-व्यावसायिक, उद्योजक अशा अनेकांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जावू नये, यासाठी अशी विधाने केली जातात.

देशातील लोकांचे लसीकरण झालेले नसताना, मोदींनी इतर देशांना लस विकून त्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना भाजपने आवर घालावा, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही. दानवे यांना काळं दिसणार नाही, म्हणून पाढरं फासण्यात येईल. तसेच त्यांचे पांढरे कपडे काळे करू, अशा इशारा औताडे यांनी दिला.

यावेळी सचिव अनिल मानकापे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पवार, शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, निलेश पवार, गणेश घोरपडे, संतोष शिंदे, सुमेध निमगावकर, शेख युनूस, शकील शहा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

दानवे हा म्हसोबाला सोडलेला बोकड…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हा म्हसोबाला सोडलेला बोकड आहे, असे आम्हीही म्हणून शकतो, परंतू तसं आम्ही म्हणणार नाही. दानवे यांनी याआधीही शेतकरी, सैनिकांबद्दलही अपशब्द वापरून त्यांचा अपमान केलेला आहे. असेही औताडे म्हणाले.

हेही वाचले का? 

Back to top button