परभणीच्या 11 तरुणांनी केली सायकलद्वारे पर्यावरण जागृती | पुढारी

परभणीच्या 11 तरुणांनी केली सायकलद्वारे पर्यावरण जागृती

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी ते पंढरपूर असा 320 किमी. चा प्रवास करून शहरातील 11 तरूणांनी सायकलींव्दारे पर्यावरण
संवर्धनबाबत जनजागृती केली. अवघ्या दोनच दिवसांत हे अंतर पार केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परभणी ते पंढरपूर असे 320 किमीचे अंतर अवघ्या दोन दिवसांत 11 सायकलस्वारांनी पूर्ण करून तिसर्‍या दिवशी विठ्ठल चरणी ते नतमस्तक झाले. या प्रवासांच्या पहिल्या दिवशी परभणी-माजलगाव-धारूर-केजकळंब येथे मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी येरमाळा बार्शी-कुर्डुवाडीपंढरपूर असा त्यांनी प्रवास केलेला आहे. या प्रवासात ठिकठिकाणी पांडुरंगांच्या दर्शनाला पायी येणार्‍या वारकर्‍यांसह ग्रामस्थांनापर्यावरण जनजागृतीचा संदेशही या सायकलस्वारांनी याप्रसंगी दिला. 3 जुलै रोजी पंढरपूर व नाशिक सायकलिस्टकडून पंढरपूर येथे प्रदक्षिणा, रिंगण, पर्यावरण संवर्धन शपथ आणि विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला होता. सायकलस्वारांसह वारकर्‍यांना प्रवासात अल्पोपहार, जेवण आणि राहण्याची सुविधा देण्यासाठी गुंडेवार, बंडोपंत दशरथे, धनंजय मोरे, देशपांडे, नाना निकते यांनी पुढाकार घेतलाहोता.सायकलस्वारांत ज्ञानराज खटींग, डॉ. दिनेश बोबडे, प्रद्युम्न शिंदे, वैभव ठाकूर, कृष्णा जावळे, शंकर फुटके, पंढरीनाथ भंडारवाड, दीपक चव्हाण, ज्ञानेश्‍वर मापारी, अनिल कांबळे, बालाजी तावरे यांचा सहभाग होता.

Back to top button