औरंगाबाद : मनसेच्या सभेतील सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

औरंगाबाद : मनसेच्या सभेतील सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : 1 मे रोजी खडकेश्‍वर येथील मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होती. या सभेत आलेल्या नांदेड येथील मनसे जिल्हाप्रमुख मनिंदरसिंग ऊर्फ मोन्टीसिंग धरमसिंग जहागीरदार (38, रा. नांदेड) यांच्या गळ्यातील 200 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली होती. या चोरट्यांना सिटी चौक पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सोनसाखळी जप्त केली आहे. दत्ता श्रीमंत जाधव (25, रा. बीड) व उमेश सत्यभान टल्‍ले (35 रा. बीड) अशी आरोपीची नावे आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित असलेल्या नांदेड येथील मनसे जिल्हाध्यक्ष मनिंदरसिंग ऊर्फ मोन्टीसिंग यांच्या गळ्यातील 200 ग्रॅम वजनाची सुमारे 6 लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत पळवली होती. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, तो बीड येथील दत्ता श्रीमंत जाधव हा चोरटा असल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button