औरंगाबाद : बजाजनगरात एकास फायटरने मारहाण | पुढारी

औरंगाबाद : बजाजनगरात एकास फायटरने मारहाण

वाळूज महानगर : ‘मी घेऊन दिलेल्या दुचाकीच्या हप्त्याचे पैसे का देत नाही’, असे म्हणून एकाच्या डोक्यात फायटरने मारून जखमी
केल्याची घटना शनिवारी बजाजनगरात घडली. आसाराम पुंडलिक मुरकुटे (42, रा.वडगाव) व त्यांचा मित्र आकाश हे शनिवारी
सांयकाळी पाचवाजेच्या सुमारास कामावरुन घराकडे जात होते.

यावेळी मुरकुटे यांच्या ओळखीचा अशोक भाऊसाहेब वाहूळ (रा. ,साईनगर, सिडको) याने त्यांना बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात अडवून वाद घालण्यास सुरुवात केली.यावेळी मुरकुटे त्यास समजावून सांगत असताना अशोक वाहूळ याने आसाराम मुरकटे यांच्या डोक्यात फायटरने मारहाण करून त्यांचे डोके फोडले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Back to top button