गेवराई तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या | पुढारी

गेवराई तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. अंकुश अच्युतराव सावंत (50, रा. रांजणी), भीमराव देवराव कुटे (52, रा. मारफळा) अशी मृतांची नावे आहेत.
कुटे यांनी गेवराई येथील भारतीय स्टेट शाखेतून दोन लाख सत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते. परंतु शेतातून समाधानकारक उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. यातून त्यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसरी घटना रांजणी येथे घडली. अंकुश अच्युतराव सावंत (50) यांनी 2 जुलै रोजी स्वत:च्या शेतात विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. सावंत यांच्याकडे बँकेचे
कर्ज होते, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. या दोन्ही घटनेप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button