औरंगाबाद : पाचोड परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुडगूस, नागरिक चिंतेत | पुढारी

औरंगाबाद : पाचोड परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुडगूस, नागरिक चिंतेत

पाचोड, पुढारी वृत्तसेवा ः पाचोडसह पैठण तालुक्यात हॉटेल अथवा बाजारातील रस्त्यालगत उभ्या केलेल्या दुचाकी चोरी होण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. चोरीच्या घटना वाढत असल्या तरी पोलिसांच्या हाती दुचाकी चोर लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

पाचोड पोलिस ठाणे अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणार्‍या टोळीतील सदस्य हे बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दुचाकी चोरी होत असल्या तरी पोलिसांना दुचाकी चोर हाती लागत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button