औरंगाबाद: अवघ्या 145 रुपयांत रोज पोहोचा पुण्याला | पुढारी

औरंगाबाद: अवघ्या 145 रुपयांत रोज पोहोचा पुण्याला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी नांदेड- हडपसर ही द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस
पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला असून, ही रेल्वे 5 जुलैपासून दररोज धावणार आहे. या रेल्वेसेवेमुळे औरंगाबादहून पुण्याला प्रवास
करणाऱ्या प्रवाशांना रात्री गाडीत बसताच रात्रभर आराम करून सकाळी 5.30 वाजता पुण्यात उतरता येणार आहे. ही सेवा केवळ 145
रुपयांसह 1 हजार 30 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

या गाडीचे उद्घाटन 4 जुलै रोजी जालना येथून करण्यात येईल. येथून ती सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड,
कोपरगाव मार्गे पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 3.30 वाजता पोहोचेल. पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे स्थानक बदलून, ते पुणे करण्यात आले आहे. नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून 5 जुलैपासून दररोज दुपारी 3.15 वाजता सुटेल. औरंगाबादेत रात्री 8.20 वाजता पोहोचेल आणि सकाळी 5.30 वाजता पुण्यात पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी पुणे स्थानकातून रात्री 9.35 वाजता सुटेल, ती औरंगाबादला सकाळी 5.5 मिनिटांनी पोहोचणार आहे, तर
नांदेडला सकाळी 10.20 वाजता पोहोचेल. सुरक्षित प्रवासासाठी डब्यांच्या आत आणि प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जे अनधिकृत व्यक्‍तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील.

जनरलसह एसी कोच

या रेल्वेला 15 डबे असणार असून, यांत जनरल-4, स्लीपर-5, एसी 2-1, एसी3-4 असे डबे राहणार आहेत. त्यामुळे कमी पैशात सर्वसामांन्यासह प्रत्येकाला आरामदायी प्रवास करता येणार आहे. रात्री पुण्यात मुक्‍काम करण्याऐवजी गाडीतच आराम आणि मुक्‍कामही करता येणार असल्याने पुण्यात काम पूर्ण हेाताच परतीच्या मार्गावर येता येणार आहे. म्हणजे मुक्‍कामाची गरज राहणार नाही.

असे असतील दर

दररोज धावणार्‍या नांदेड-पुणे एक्स्प्रेसमधून एकदम कमी पैशात पुणे वारी करता येणार आहे.
जनरल कोच:145

स्लीपर कोच: 285

एसी 2 कोच:1030

एसी 3 कोच : 740 रुपये

Back to top button