औरंगाबाद : आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला 30 लाखांचा निधी | पुढारी

औरंगाबाद : आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला 30 लाखांचा निधी

औरंगाबाद : मान्सूनला सुरूवात झाल्यानंतर शासनाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी वितरित केला आहे. यात जिल्ह्याला 30 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी 2 कोटी 40 लाख रुपये वितरीत
केले आहेत.

पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने शोध व बचाव पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु या पथकाकडे मुबलक प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध नाही. सध्या जिल्ह्यात 10 बोटी, 307 लाईफ जॅकेट आहेत. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यावरून शासनाने यंदा प्रत्येक जिल्ह्यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला नुकताच हा निधी प्राप्त झाला आहे.

Back to top button