औरंगाबाद : गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त | पुढारी

औरंगाबाद : गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : कारने जाणार्‍या एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व पाच काडतुसे पोलिसांना सापडले. याप्रकरणी बुधवारी (दि.22) एका व्यक् तीसह महिलेला अटक करण्यात आली. विनोद सरदार परदेशी (वय 35, रा. जामडी, ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या महिलेचादेखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने तिला देखील अटक करण्यात आली.

चिंचोलीहून ( लि ) नागदकडे कारने ( एम एच 20 बी एन 6044 ) जाणार्‍या एका व्यक् तीकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली होती. सावरगाव फाटा (ता. कन्नड) येथे नाकाबंदीत वाहन तपासणीत एका कारमध्ये विनापरवाना असलेले गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे सापडली. विनोद परदेशीसह एका महिलेला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन लाख पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button