औरंगाबाद : बजाजनगरातून 4.5 लाखांच्या पेंटसह मिनी टेम्पो लांबविला | पुढारी

औरंगाबाद : बजाजनगरातून 4.5 लाखांच्या पेंटसह मिनी टेम्पो लांबविला

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : पेंटच्या बकेट व बॉक्स भरलेला मिनी टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 21 जून रोजी रात्री बजाजनगरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजा दिलीप तांगडे (28 रा. बजाजनगर) यांनी 21 जून रोजी सायंकाळी पाटोदा येथील कणसाई नेरोलॅक पेंट कंपनीच्या गोडाउनमधून त्यांच्या मालकीच्या मिनी टेम्पो ( एमएच 20 ईएल 0626) मध्ये नांदेड व वसमत येथे पोहोच करण्यासाठी साडेचार लाख रुपये किमतीच्या पेंट्सच्या बकेट व बॉक्स भरले होते. त्यानंतर तांगडे हे आठ वाजेच्या सुमारास मालाने भरलेला टेम्पो घेऊन बजाजनगर येथील त्यांच्या घरी आले होते. दरम्यान त्यांनी सदरील टेम्पो घरासमोर उभा करून जेवण केल्यानंतर ते घरात झोपी गेले.

दुसर्‍या दिवशी पहाटे ते नांदेड येथे मालाचा टेम्पो घेऊन जाण्यासाठी टेम्पो उभा केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्याठिकाणी त्यांचा टेम्पो दिसून आला नाही. मालाने भरलेला टेम्पो चोरीला गेल्याचे लक्षात येताच जिजा तांगडे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून साडे चार लाखांचे पेंट व 80 हजारांचा मिनी टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button