औरंगाबाद : मेगा ब्लॉकमुळे 15 रेल्वे रद्द, नऊ उशिराने धावणार | पुढारी

औरंगाबाद : मेगा ब्लॉकमुळे 15 रेल्वे रद्द, नऊ उशिराने धावणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मनमाड-अंकाई किल्‍ला दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्याकरीता सुमारे 15 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 9 रेल्वे उशिराने धावणार आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.

अंशतः रद्द

नांदेड-मनमाड 19 ते 27 जून, मनमाड-नांदेड 20 ते 28 जून, धर्माबाद-मनमाड 27 व 28 जून, मनमाड-धर्माबाद 27 जून व 28 जून, काकिनाडा-श्रीसाईनगर शिर्डी 25 व 27 जून, श्रीसाईनगर शिर्डी-काकिनाडा 26 व 28 जून, सिकंदराबादश्रीसाईनगर शिर्डी 24 व 26 जून, श्री साईनगर शिर्डी-सिकंदराबाद 25 व 27 जून, मनमाड-सिकंदराबाद 25 ते 28 जून, तर सिकंदराबाद-मनमाड 24 ते 27 जून दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.

उशिरा धावणार्‍या गाड्या

अमृतसर-नांदेड 23 जून रोजी अडीच तास, अमृतसर-नांदेड 24 जून रोजी चार तास, तपोवन एक्सप्रेस 25 जून रोजी 45,मिनिटे, अमृतसर-नांदेड 25 जून 3.45 तास, मुंबई-नांदेड 26 जून रोजी 15 मिनिटे, अमृतसरनांदेड 26 जून ला 4.15 तास उशिराने धावणार आहेत.

पूर्णतः रद्द…

विशाखापटणम- श्री साईनगर शिर्डी ही गाडी 23 जून रोजी तर श्री साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम 24 जून, मुंबई-जालना 25 जून, जालना- मुंबई 26 जून, मुंबई-आदिलाबाद 27, 28 जून, आदिलाबाद- मुंबई 26,27 जून, दादर-काझीपेट 26 जून, काझीपेट दादर 25 जून, काझीपेट-पुणे 26 जून, पुणे-काझीपेट 24 जून जालना – श्री साईनगर शिर्डी 27. 28 जून, श्री साईनगर शिर्डी- जालना 27, 28 जून, जालना- नगरसोल 24 जून, नगरसोल- जालना 24 व 26 जून रोजी, रोजी पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button