परभणी : शालार्थ प्रणालीत नावासाठी सात शिक्षकांचे उपोषण | पुढारी

परभणी : शालार्थ प्रणालीत नावासाठी सात शिक्षकांचे उपोषण

परभणी; पुढारी वृत्तसेवा : शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट केले जात नसल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या मानवत येथील सात शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर कुटुंबीयांसह बुधवारी (दि.15) उपोषण सुरू केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक क्षणाधिकार्‍यांनी मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयात 2014 पासून विनावेतन काम करणार्‍या शिक्षकांनी शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याबाबत अनेकवेळा अभिप्राय दिलेला आहे. पण त्यांनी हा प्रस्ताव अमान्य करून न्यायापासून वंचीत ठेवले. याबाबतचा पत्रव्यवहार शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्यात झालेला आहे. यात शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने योग्य ती कार्यवाही करून शालार्थ प्रणालीबाबतचा अभिप्राय रंगाबाद येथील शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. पण शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून त्या प्रस्तावास त्रुटी काढत तो परत पाठविण्यात आलेला आहे. यामुळे सदर प्रणालीत सहशिक्षक कल्पना नारायण कोल्हे, स्नेहलता संपतराव मगर, प्रभावती रामराव कच्छवे, हेमलता भगवानराव यादव, गजानन रामराव बारहाते. सखाराम मारोतराव नाईक, पुरूषोत्तम पवार यांचा समावेश अद्यापही या प्रणालीत झालेला नाही. या सर्व प्रकाराने हे सात शिक्षक वेतनापासून वंचीत राहत आहेत. यातूनच प्रणालीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सात शिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान आ.मेघना बोर्डीकर यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांची भेट घेवून दोन तास चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधत शिक्षणाधिकार्‍यांची तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकारी आशा गरूड यांनी उपोषणस्थळी येत आठ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Back to top button