नगर-औरंगाबाद महामार्गावर क्रुझर गाडीला भीषण अपघात, एक ठार तर आठ जखमी | पुढारी

नगर-औरंगाबाद महामार्गावर क्रुझर गाडीला भीषण अपघात, एक ठार तर आठ जखमी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नगर – औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी जवळ शुक्रवारी (दि. २७) पहाटे क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोसपुरी जवळील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम. एच. १४ एच.यु. ०२२७) क्रुझर गाडीने (क्र. एम. एच.१६ ए.टी.१४०६) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. क्रुझर गाडी नगरकडून औरंगाबादकडे चालली होती. अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय ४० रा. घनवाडा) हे जागीच ठार झाले तर श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२), वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर ) हे जखमी झाले आहेत. जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच तात्काळ १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सोनई, जेऊर, जिल्हा रुग्णालय व मिरी येथील चार रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, भाऊसाहेब बंगे, डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केली. १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे जखमींसाठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button