चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल (दि.20 नोव्हेंबर ) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 71.33 टक्के मतदान झाले. तासाभरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात साडेसहा टक्क्याने आकडेवारी वाढली आहे. चिमूर आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात विक्रमी मतदान झाले आहे.
बल्लारपूर मतदार संघातून सुधीर मुनंगटीवार, संतोषसिंग रावत, डॉ. अभिलाषा गावतुरे, राजूरा मतदान संघातून सुभाष धोटे, ॲड वामनराव चटप, देवराव भोंगळे, चंद्रपूर मतदार संघातूर किशोर जोरगेवार, प्रविण पडवेकर, ब्रम्हपूरी मतदार संघातून काँग्रेसकडून विजय वड्डेटीवार, क्रिष्णा सहारे, चिमूर मतदार संघातून किर्तीकुमार भांगडिया, सतीश वारजुकर तर वरोरा मतदार संघातून प्रवीण काकडे, करण देवतळे, अनिल धानोकरकर आंदी दिग्गजांसह 94 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 23 नोव्हेंबर ला होणार आहे. सहाही विधानसभेमधील 94 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. (Maharashtra assembly polls)
70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 72.71 टक्के मतदार झाले. 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 57.95 टक्के मतदान झाले. 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 69.79 टक्के मतदान झाले. 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 80.54 टक्के मतदान झाले. 74- चिमूर विधानसभा मतदारसंघात 81.95 टक्के मतदान झाले. तर 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 69.63 टक्के मतदान झाले. यामध्ये मतदान करणाऱ्या पुरूष मतदारांची 72.32 टक्के तर महिला मतदारांची 70.32 टक्केवारी आहे. इतर मतदारांची 35.42 टक्केवारी आहे.
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये तासभरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत साडेसहा टक्के आकडेवारी वाढली आहे. सर्वात जास्त मतदान चिमूर मध्ये 81.95 तर ब्रम्हपूरी मध्ये 80.54 टक्के झाली आहे. सर्वात कमी मतदान चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 57.95 टक्के एवढी आहे. जिल्ह्यात एकूण एकूण झालेल्या 71.33 टक्यामध्ये पुरूष व महिला मतदारांनी समसमान मतदान केल्याचे दिसून येत आहे.