अकोला : अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात 5 लाख 59 हजार 757 पुरूष, 5 लाख 879 महिला आणि इतर 16 अशा एकूण 10 लाख 60 हजार 652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 64.76 आहे.
या मध्ये अकोट मतदारसंघात 68.35 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 248 पुरुष आणि 98 हजार 442 महिला, अशा एकूण 2 लाख 12 हजार 690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाळापूर मतदारसंघात 70.60 टक्के मतदान झाले. 1 लाख 16 हजार 212 पुरुष, 1 लाख 2 हजार 805 महिला आणि 1 इतर अशा एकूण 2 लाख 19 हजार 18 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
अकोला पश्चिम मतदारसंघात 57.97 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 4 हजार 809 पुरुष, 98 हजार 531 महिला आणि 7 इतर अशा एकूण 2 लाख 3 हजार 347 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.अकोला पूर्व मतदारसंघात 61.60 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 590 पुरुष, 1 लाख 4 हजार 218 महिला, इतर 3 अशा एकूण 2 लाख 18 हजार 811 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.(Maharashtra assembly polls)
मूर्तिजापूर मतदारसंघात 66.59 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 9 हजार 898 पुरुष, 96 हजार 883 महिला, इतर 5 अशा एकूण 2 लाख 6 हजार 786 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.