मुंबई : Maharashtra Assembly Polls | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आप आता महाराष्ट्रात एकही जागा लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची २७० जागांवर सहमती झाली असून काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना प्रत्येकी ९० जागा लढणार आहेत. उर्वरित १८ जागा या मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणार आहेत. आप मुंबईतील विलेपार्ले किंवा मलबार हिल मतदारसंघातून लढण्याची शक्यता होती. मात्र त्या जागेवर ठाकरे गटाने आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे आपने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे समकजते. (Maharashtra Assembly Polls)