अखेर "त्या" दोन आंदोलकांचा पुलाखालीच शोध लागला ! दोघेही जिवंत सापडले

पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले
Dhangar Reservation Movement
धनगर आरक्षण आंदोलन Pudhari
Published on
Updated on

गेल्या नऊ दिवसांपासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर शुक्रवारी सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलक जिवंत आढळून आले आहेत. पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी (दि.२६) सकाळी "आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार" असे चिठ्ठीत नमूद करून प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलन गायब झाले होते. त्यांनी छत्रपती संभाजी नगर अहमदनगर मार्गावरील प्रवारासंगम गोदावरी नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या. त्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्‍त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाने त्यांचे शोधकार्य ही हाती घेतले होते. रात्र झाल्याने हे शोधकाम थांबवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news