शेवगाव शहरालगत असणार्या हॉटेल राजयोगमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर शेवगाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, ज्योती शिंदे, रणजीत जाधव यांचे पथक शेवगाव पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना शेवगाव ते गेवराई रस्त्यावर हॉटेल राजयोग येथे एक व्यक्ती महिलाकरवी वेश्या व्यवसाय (कुंटणखाना) चालवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने माहिती शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना दिली.
त्यांच्यासह पोलिस अंमलदार प्रियंका शिरसाठ, किशोर पालवे यांना सोबत घेऊन संयुक्त पथकाने हॉटेल राजयोग येथे पथकातील पोलिस अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून पाठविले. तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर शासकीय पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकुन अमर मारूती ढाकणे (वय 24, रा. हसनापूर, ता. शेवगाव) याला पकडले. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा 21 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये दोन महिला मिळून आल्या त्यांची सुटका केली. त्यांनी आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची कबुली दिली.
दरम्यान, अमर मारूती ढाकणे याच्यासह हॉटेलचा मालक बाबासाहेब अंधारे (पुर्ण नाव नाही, रा. शेवगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.