पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर नवरात्र महोत्सवानिमित्ताने देवीच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे मंदिर व गडाचा भाग लखलखित झाला आहे.
आधुनिक पद्धतीच्या चमकदार विद्युत रंगाच्या रोषणाईने लांब अंतरावर असलेल्या प्रत्येकाला देवी मंदिरावरची रोषणाईने मोहित करणारी ठरत आहे.
वेगवेगळ्या रंगाची झगझगीत रोषणाई मंदिर आणि परिसर प्रकाशमय झाला आहे. गडावर येणार्या रस्ताच्या दोन्ही बाजूने विद्युत रोषणाई केल्याने रात्री गडावर येणासाठी भाविकांना त्रास होणार नसून रस्तावर प्रखर असा उजेड पडला आहे.
लांबवरून नजरेत दिसत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी ही रोषणाई भाविक भक्तांना पाहावयास मिळत आहे. मोहटा देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई प्रमाणे मंदिर परिसरात चांगला पाऊस झाल्याने विद्युत झाडांचा हिरवागार शालू अधिकची भर वाटत आहे. देवस्थाने आलेल्या भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी देवस्थान समिती, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी भाविकांच्या स्वागतासाठी ‘स्वागत कमानी’ तसेच फ्लेक्स बोर्ड दिमाखात लावले आहेत. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा महोत्सव देवस्थान समिती पार पाडत आहे.