नगर : उड्डाणपुलाचे आज लोकार्पण ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नगर : उड्डाणपुलाचे आज लोकार्पण ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या उड्डाणपुलाचे शनिवारी (दि. 19) रोजी उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नगरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते अशोक हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे काम करण्यात आले आहे.

पुलाची लांबी 3.8 किलोमीटर असून, चारपदरी असणार्‍या उड्डाणपुलाची रुंदी 19.2 मीटर आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी केंद्र सरकारने 331 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी तीन वाजता लोकार्पण होणार आहे.
या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, आमदार सुधीर तांबे, आमदार राम शिंदे, आमदार किशोर दराडे, महापौर रोहिणी शेंडगे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान, पुलावर विजेच्या खांबावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तर, पिलरवर शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजता उड्डाणपुलावर फटाक्यांची आतषबाजी आणि लेझर शो करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news