Crime News | मुलीवर अतिप्रसंग; पित्याला सश्रम कारावास

पित्याने स्वतःच्याच मुलीवर अतिप्रसंग करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी १२ वर्षे सश्रम कारावासासह २५ हजार रुपये दंड
Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

पित्याने स्वतःच्याच मुलीवर अतिप्रसंग करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला १२ वर्षे सश्रम कारावासासह २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अधिक कारावासाची शिक्षा ठोठावली, अशी माहिती सरकारी वकील एस. एम. वाक्चौरे यांनी दिली.

आरोपी पिता, आजोबा व १५ वर्षांची मुलगी असे तिघेजण तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करून एकत्र रहात होते. आरोपीची पत्नी घर सोडून गेली होती. यामुळे घरात तिघेच राहत होते. १० ऑक्टोबर २०२२ रोजी नातीने, पोटात दुखते असे आजोबाला सांगितले. यामुळे आजोबांनी तिला तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.

गोळ्या, औषध घेवून ते घरी परतले असता, आजोबांनी नातीला विश्वासात घेऊन विचारले की, 'तुझे पोट नेमकं कशामुळे दुखते.' यावर नातीने सांगितले की, '६ महिन्यांपूर्वी दुपारी घरी कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत वडिलांनी जीवे मारण्याची धमकी देत अतिप्रसंग केला.' या अघोरी कृत्यामुळे नात गर्भवती राहिल्याचे समजताच आजोबांनी शहर पोलिस ठाण्यात स्वतःच्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली.

या घटनेचा तपास करून बारकु जाने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. वाय. बी. मनाठकर यांच्यासमोर झाली. सरकारी वकील संजय वाक्चौरे यांनी कामकाज पाहिले. सुनावणी दरम्यान, त्यांनी प्रबळ युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी वडिलास १२ वर्षे सश्रम कारावासासह २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अधिक कारावास, अशी शिक्षा सुनावली.

पीडित मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची..!

अतिप्रसंगप्रकरणी न्यायालयामध्ये पिडित मुलीसह डॉ. मृणाल पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली. एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news