MLA Rohit Pawar : कर्जतचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाचा संसर्ग - पुढारी

MLA Rohit Pawar : कर्जतचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.३) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे कर्जत येथे आले होते. चार प्रभागातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांवर बैठक घेतली.

एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत ते सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनीदेखील टेस्ट करून घेतल्या. मात्र त्यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यांना कोणताही त्रास होत नाही, मात्र पुरेशी काळजी घेता यावी यासाठी पुणे येथे एका खाजगी रुग्णालयांमध्ये ते भरती झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या तपासण्या करून घ्याव्यात व काळजी घ्यावी असे आव्हान रोहित पवार यांनी केले आहे.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे, ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलं आहे, की तुमच्या समवेत मी दोन वर्ष कोरोनाशी लढा देऊन त्याला हुलकावणी देत होतो. परंतु, अखेर त्यांनी मला गाठलेच, मात्र सर्वांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे. परंतु, माझ्या संपर्कात आलेले यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी

Back to top button