अहमदनगर : कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एकास अटक

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेरमधील उपकरागृहातून पलायन करणाऱ्या कैद्यांना मदत करणाऱ्या मालेगावातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहंमदरिजवान मोहंमद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला (वय ५०) याला मालेगावातील एका परिसरातून आज (दि.१७) पोलिसांनी ताब्यात घेतले.
संगमनेर येथील उपकारागृहाचे तीन गज कापून राहुल देवीदास काळे, रोशन रमेश दधेल उर्फ थापा मच्छिंद्र, मनाजी जाधव व अनिल छबु ढोले हे चार कैदी पळून गेले होते. या कैद्यांना मदत करणाऱ्या सातजणांची नावे समोर आली आहेत. प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २४, रा. घुलेवाडी), कलिम अकबर पठाण (वय २०, रा. कोल्हेवाडी रोड) व हलिम अकबर पठाण (वय २२, रा. जमजम कॉलनी) या तिघांना पोलिसांनी या अगोदरच अटक केली आहे. त्यानंतर यातील मुख्य कैदी राहुल काळे याचा साथीदार मित्र असलेला रिजवान बॅटरीवाला यानेही मालेगावात कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मालेगावातील एका परिसरातून ताब्यात घेत पोलिसांनी त्याला आज (दि.१७) संगमनेरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- जळगावमध्ये पोलीस भरती परिक्षेत ब्लूटूथचा वापर, दोघांना अटक; एरंडोल पोलिसांची कारवाई
- खुनाच्या गुन्ह्यातील तिघे जेरबंद ; कापसाच्या चोरीच्या उद्देशाने शेतकर्याची हत्या
- नाशिक : पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी