कर्जत : पुढारी वृत्तसेवा : पाटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या इंतजा शेख यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्यांविरोधात त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मात्र, पोलिस कोणतीही मदत करीत नसल्याचा आरोप शेख यांनी केला. शेख म्हणाल्या, पाटेवाडी येथे गावचे सरपंच मोहन पांडुरंग कदम व कुुटुंबीयांनी शिवीगाळ करून स्वस्त धान्य दुकानातून माल मिळणार नसल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली.
यासंदर्भात शेख यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला. मात्र, त्याची पोलिस दखल घेत नाहीत. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास वृद्ध भूमिहीन संघटनेचे अध्यक्ष शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा श्रीमती शेख यांनी दिला.
हेही वाचा :