Grampanchayat Result : गुंजाळवाडी आश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा आ थोरात गटाकडे | पुढारी

Grampanchayat Result : गुंजाळवाडी आश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा आ थोरात गटाकडे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळ वाडी अश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा या तीन ग्रामपंचायती माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांच्या गटाकडे आल्या तर शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द आणि पठार भागातील घारगाव ग्रामपंचायत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटा कडे आले आहेत तर बिनविरोध झालेल्या दोन ग्रामपंचायती थोरात गटाकडे आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळ वाडी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले आणि जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंच पदाचे उमेदवार नरेंद्र उर्फ अमोल संभाजी गुंजाळ हे विजयी झाले आहे तर त्यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सदस्य पदाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.

संबंधित बातम्या :

मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रथमच गुंजाळवाडी ग्रामपंचायती मध्ये जनसेवा मंडळाचे रोहिदास रेवजी गुंजाळ यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली होती तसेच सदस्य पदाचे काही उमेदवार उभे केले होते मात्र मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले

शिर्डी मतदार संघातील आश्वी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अलका बापूसाहेब गायकवाड यांच्यासह १० सदस्य निवडून आले आहे तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना अवघ्या एका जागेवर समा धान मानावे लागले आहे.

तर आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे रवींद्र सुभाष बर्डे यांचा पराभव करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळा साहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार नामदेव किसन शिंदे हे अवघ्या १२ मताने विजयी झाले आहे तर सदस्य पदाच्या निवडणु कीत १५ जागांपैकी १० जागा आमदार थोरात गटाला मिळाल्या तर अवघ्या ५ जागांवर ना विखे गटाला समाधान मानावे लागले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असणाऱ्या घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाज पचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जना र्दन आहेर यांचे बंधू आणि माजी सरपंच अर्चना आहेर यांचे पती नितीन म्हातारबा आहेर हे विजयी झाले आहे तर त्यांच्याच गटाच्या सदस्य पदाच्या सर्व जागाविजयी झाल्या आहेत तर विरोधी असलेलेकाँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सरपंचपदाचे सर्वच उमेदवारांना पराभ वाचा सामना करावा लागला. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सह सर्व सदस्य पदाचे उमेदवार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्याच गटाचे आले आहेत तर विरोधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन सेवा मंडळाचे गटाला सरपंचपदासह सदस्य पदांची एकही जागा मिळवता आली नाही सर्व उमेदवारांचा पराभव करण्यात झाला आहे

Back to top button