अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्राच्या स्वामित्व योजनेंतर्गत घरे आणि जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. त्यातून प्रत्येक ग्रामीण मालमत्ताधारकाला प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहे. जिल्ह्यातील 1 हजार 137 गावांचे ड्रोन सर्व्हे पूर्ण झाले असून, आतापर्यंत 36 हजार 756 गावठाणांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. या मालकी प्रमाणपत्रामुळे नागरिकांना बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने जमाबंदी गावठाण योजना 2019 मध्ये हाती घेतली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील 44 हजार 500 गावांतील गावठाणांचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले. सर्व्हेच्या माध्यमातून जमिनीचे आणि शेतीची मोजणी करून घेतली जात आहे. राज्याची हीच योजना 2021 मध्ये देशातील इतर राज्यात राबविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या योजना आता प्रधानमंत्री स्वामित्व योजना म्हणून गणली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 1 हजार 158 गावांचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून महापालिका, नगरपालिका व ज्या गावांचा सर्व्हे झालेले आहेत, अशी गावे वगळण्यात आली. ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालेल्या 540 गावांची स्थळपाहणी करून आतापर्यंत 36 हजार 756 प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. यांचा लाभ 57 हजार 617 व्यक्तींना झाला आहे. ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी आता सनद फी आकारली जात आहे.
नगर 71, कर्जत 99, अकोले 176, कोपरगाव 49, राहुरी 61, जामखेड 69, नेवासा 100, श्रीरामपूर 28, श्रीगोंदा 74, शेवगाव 87, पाथर्डी 107, संगमनेर 102, राहाता 22, पारनेर 92.
संगमनेर 4931, कोपरगाव 1940, राहाता 1987, श्रीरामपूर 1656, नेवासा 2272, शेवगाव 1494, पाथर्डी 2709, नगर 6497, राहुरी 4080, श्रीगोंदा 1924, कर्जत 1453, जामखेड 5813.
25 वर्गमीटर मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी 125 रुपये, 50 वर्गमीटरसाठी 250, तर 100 वर्गमीटर मालमत्तेसाठी 500 रुपये सनद फी आकारली जात आहे.
– सुनील इंदलकर, अधीक्षक, जिल्हा भूमिअभिलेख
हेही वाचा