राज्य कृती समितीशी चर्चा करण्यात यावी. नुकतेच मे महिन्यात माथाडी महामंडळाचे राज्य अधिवशेन नगरमध्ये पार पाडले. त्यामध्ये माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हा ठराव एकमताने संमत करण्यात आला होता. या सरकारने माथाडी कायदा कसा मजबूत करता येईल, यावर भर देण्यात यावा. आ. संग्राम जगताप म्हणाले, माथाडी कायद्याबाबत सरकाराने योग्य तो निर्णय घ्यावा, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्वीपासून हा कायदा अस्तित्वात असून, त्यांची अंमलबजावणी ही नगरपासून सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, याबाबत संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती कामगार संघटनांशी चर्चा करूनही आपला अहवाल सादर करेल त्यानंतर विधेयकाबाबत निर्णय घेतला जाईल.