कर्जत (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील देमनवाडी येथे शीतपेयातून चार वर्षांचा चिमुकला, त्याची आई आणि आणखी दोघांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना कर्जतच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील देमानवाडी येथे काल (दि. 6) दुपारी दीड वाजता माई देवकाते यांच्या घरी पतीचा मित्र आला होता. त्याच्यासह घरातील व्यक्तींना माईने सरबत पिण्यासाठी बनविले होते. यानंतर पतीच्या मित्राने आपण शीतपेय आणले आहे, ते प्या, असे म्हणाला. ते शीतपेय प्रमोद पालवे, माई देवकाते, शिवराज देवकाते (वय 4), बाबाजी गायकवाड असे चौघेजण पिले. ही घटना दुपारी दीड वाजता घडली. यानंतर काहीच वेळाने चिमुकला शिवराजला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याच्या आईलाही त्रास सुरू झाला. यानंतर आणखी दोघांना ही त्रास सुरू झाला. रुग्णालयात आणेपर्यंत प्रमोद पालवे बेशुद्ध पडला. रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. माहिती मिळताच पोलिस रुग्णालयात दाखल झाले. नातेवाईकांनी शीतपेव्याची बाटली पोलिसांच्या ताब्यात दिली. याबाबत पोलिस तपास करत आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने शीतपेय पिण्यासाठी आणले होते. त्यांनी मात्र ते घेतले नाही. यामुळे या शीतपेयामध्ये आणखी काही मिसळले आहे का? अशी शंका डॉक्टरांसह सर्वांनी व्यक्त केली.
हेही वाचा: