संगमनेरात लव्ह जिहादच्या संशयातून बेदम मारहाण | पुढारी

संगमनेरात लव्ह जिहादच्या संशयातून बेदम मारहाण

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेरातील कॅफे सेंटरमध्ये मुलीसोबत गप्पा मारत बसल्याने हा लव्ह- जिहादचा प्रकार असल्याचे समजुन 10-15 जणांनी दोघांचे अपह रण करीत त्यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 15 जणांवर अपहरणासह दरोड्याचा गुन्हा नोंदवित 8जणांना ताब्यात घेतले आहे. संगमनेर शहरात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मालदाड रोडवर एका कॅफे सेंटरमध्ये सिन्नर तालुक्या तील एक तरुणी सचिनकुमार महंतो या मित्रासोबत गप्पा करीत बसली होती.

काही वेळानंतर कॅफेमध्ये एक तरुण येवून बसला. यानंतर त्यांच्यात गप्पा रंगल्या. हा सर्व प्रकार पाहून काहींना ‘लव्ह- जिहाद’ असल्याचा संशय आला. त्या तरुणाने अन्य सहकार्‍यांना बोलाविले. क ाही वेळातच 6 जन कॅफे हाऊसजवळ आले. त्यांनी दोघांना बळजबरीने दुचाकीवर बसविले. सुकेवाडी-खांजापूर येथे विठ्ठलकडा परिसरात नेले. तेथे आणखी काही तरुण एकत्र आले. 10 -15 जणांनी दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. कोल्हेवाडी रोड येथील मफाज मतीनखान पठाण (वय 19 वर्षे) व सचिनकुमार महंतो यास किरकोळ जखम झाली आहे.

या घटनेनंतर एका समाजाचा जमाव पोलिस ठाण्यात आला. पो. नि. भगवान मथुरे यांनी सामोरे जात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगत सर्वांना शांत केले. दरम्यान, पोलिसांनी मफाज पठाण याचा जवाब नोंदवून घेत 15 जणांवर दरोडा व अपहरण करणे व दंगलीचा गुन्हा दाखल केला.

करण संपत गलांडे (वय 21, रा. अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा. अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा. नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा. कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा. अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा. घुलेवाडी) या आठ जणांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक ओला रात्री आले संगमनेरला!
या घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने रात्री 2 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरला भेट देत माहिती घेतली. अधिकार्‍यांना सूचना केल्या. पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले.

Back to top button