अहमदनगर
राहुरी फॅक्टरीमध्ये मालाचा टेम्पो चोरीस
राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी फॅक्टरी येथील आदर्श पतसंस्थेसमोर लावलेला टाटा कंपनीचा माल वाहतूक टेम्पो चोरट्यांनी चोरून नेला. 18 मार्च रोजी रात्री घडली. चक्क टेम्पो चोरीस गेल्याने वाहन मालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश अशोक कोबरणे हा तरूण राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे राहतो.
त्याच्याकडे (एम. एच. 14 जी यु 0281) नंबरचा टाटा कंपनीचा माल वाहतूक टेम्पो आहे. गणेश कोबरणे टेम्पो भाडे तत्वावर देतो. दि. 18 मार्च रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास कोबरणे याचा मित्र योगेश मोरे याला राहुरी फक्टरी येथे टेम्पोचे भाडे होते. त्याला ठिकाण माहित नसल्याने कोबरणे स्वतःचा टेम्पो आदर्श पतसंस्थाचे समोर लावुन त्याला नर्सिंग होम दाखवण्यास गेला. अवघ्या 10 मिनिटांनी कोबरणे परत आला, असता टेम्पो गायब झाल्याचे दिसले.