संगमनेर : सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : खा. सदाशिव लोखंडे | पुढारी

संगमनेर : सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : खा. सदाशिव लोखंडे

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दोन दिवसांपूर्वी गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या शेत पिकांची खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून शेतकर्‍यांना धीर दिला.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, वरुडी पठार, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार या गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. या गारपिटीने वरील गावातील शेतकर्‍यांच्या डाळिंब, कांदा, टोमॅटो, मिरची तसेच इतर भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खा. सदाशिव लोखंडे यांनी कर्जुले पठारचे भाऊराव वसंत गुंजाळ, शांताराम देवराम गुंजाळ, वरुडीपठारचे सावळेराम कुशाबा गोडसे, गुंजाळवाडी पठारचे लहान भाऊ कारभारी कराळे , भाऊसाहेब सुखदेव भागवत व भिवसेन सुखदेव भागवत, रोहिदास रामदास कराळे या शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करत तात्काळ प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आले.

खा. लोखंडे यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे, उपाजिल्हा प्रमुख अर्जुन काशीद, रणजित ढेरंगे, तालुका प्रमुख रमेश काळे, मागासवर्गीय सेलचे सोमनाथ भालेराव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कावेरी नवले, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, गुलाब भोसले, कर्जुले पठारचे, सरपंच किरण भागवत, शाम रहाणे, अंकुश रहाणे, भाऊसाहेब बोराडे उपस्थित होते.

Back to top button