संगमनेर : जुन्या पेन्शन मागणीसाठी तहसीलवर मोर्चा | पुढारी

संगमनेर : जुन्या पेन्शन मागणीसाठी तहसीलवर मोर्चा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : ‘एकच मशन, जुनी पेन्शन’ असा नारा देत शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच जागरण गोंधळ घातला.

शासकीय, निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गेल्या चार दिवसांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालय मोर्चा काढला दोन दिवसांपासून संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात धरणे आंदोलन झाली तरीही सरकारने प्रकारचा निर्णय करत नाही म्हणून सरकारला जाग आणण्या साठी समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला . हा मोर्चा सिद्धार्थ विद्यालय बीएड कॉलेज अकोले रोड, कॉलेज बस स्थानक छत्रपतीशिवाजी महाराज पुतळा अशोक चौक मार्गे संगम नेरच्या तहसील कार्यालयावर जाऊन धड कला.

विविध घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक वाडेकर, उपाध्यक्ष उमेश गुंजाळ, सेक्रेटरी मुस्ताख शेख, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन फटांगरे, प्राथमिक दिव्यांग संघटनेचे राजू आव्हाड आदींनी दिला आहे. मुख्याध्यापक मच्छिंद्र दिघे संदीप सातपुते सुशांत सातपुते आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच आंदोलनकर्त्यांनी या तहसीलच्या कार्यालयात शासनाच्या विरोधात जागरण गोंधळ सुद्धा घातला. मोर्चे करांच्या वतीने दिलेले निवेदन तहसीलदार अमोल निकम यांनी स्वीकारले.

Back to top button