पारनेर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी दुपारी हंगा येथे टोळक्याने मारहाण केलेल्यापैकी दोघांना सुपा पोलिसांनी आटक केली आहे. पारनेर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
सोमवारी दुपारी चारा वाजता हंगा तेथे अक्षय थोरात व सहकारी मित्राला हंगा येथील आश्रफ शेख, आरबाज शेख, शाबीर शेख, समीर शेख, आजय बर्डे, ओंकार शिंदे, आफसर शेख, दिशान शेख, आयाज शेख (रा. सर्व हंगा ता. पारनेर) यांनी कोयता, लोखंडी राँडने मारहाण केली.
यात अक्षय थोरात जखमी झाला असून, त्याच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुपा पोलिसांनी विशाल कारभारी लांडे यांच्या फिर्यादीवरून या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.