पारनेर : उपमुख्यमंत्र्यांकडे विकासकामांची मागणी | पुढारी

पारनेर : उपमुख्यमंत्र्यांकडे विकासकामांची मागणी

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गटेवाडी येथे कन्हैया उद्योग समूहाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गटेवाडीच्या सरपंच मंगल चंद्रकांत गट यांनी भेट घेत ग्रामविकासासाठी मदतीची मागणी केली. तसेच, अनेक मागणीचे प्रस्ताव त्यांना दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समस्या जाणून घेऊन पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

पारनेर तालुक्यात गटेवाडी येथे कन्हैया उद्योग समूहाचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरणाच्या कामाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे गटेवाडीच्या वैभवात भर पडली असून, यामुळे परिसरातील तरुणांना उद्योग धंदा मिळण्यास मदत झाली आहे. गावच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सरपंच मंगल गट यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. सरपंचांना घेऊन अनेक योजना राबवल्या असून, निधी थेट ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येत आहे.

Back to top button