नगर : दर्जेदार विकासकामे हाच अजेंडा : आ. संग्राम जगताप | पुढारी

नगर : दर्जेदार विकासकामे हाच अजेंडा : आ. संग्राम जगताप

नगर; पुढारी वृत्तसेवा : गुलमोहर रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. नियोजनबद्ध, कायमस्वरूपी व दर्जेदार विकास कामे करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. मनपा प्रशासनाला या रस्त्याचे काम दर्जेदार करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. गुलमोहर रस्ता डांबरीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.

गुलमोहर पोलिस चौकी ते श्रीराम चौक ते नामदे चौक औरंगाबाद रोडपर्यंतच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. गुलमोहर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूने गुलमोहराची झाडे लावून रस्त्याची ओळख कायम ठेवू. हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, बाळासाहेब पवार, तायगा शिंदे, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, इंजिनिअर मनोज पारखे आदी उपस्थित होते.

Back to top button