पिंपरी : जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक | पुढारी

पिंपरी : जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक

पिंपरी : जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची चार लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 12 एप्रिल 2018 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला. शशिकांत राजाराम देसाई (50, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आळंदी येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिदिवस एक टक्का जास्तीचा नफा मिळवून देईल, असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी चार लाख रुपये गुंतवले. दररोज एक टक्का नफा मिळणार्‍या स्कीममध्ये पाच वर्षांत देसाई यांना त्यांनी गुंतवलेल्या रकमेतून 10 हजार 200 रुपये परत मिळाले. त्यानंतर उर्वरित तीन लाख 89 हजार 800 रुपये मुद्दल आणि त्यावरील नफा न देता त्यांची आरोपीने फसवणूक केली. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.

Back to top button