राहुरी : कत्तलीसाठी नेणारी जनावरे पकडली; 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

राहुरी : कत्तलीसाठी नेणारी जनावरे पकडली; 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

राहुरी(नगर) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सात्रळ येथे पोलिस पथकाने कारवाई करून गाय व वासरू कत्तलीसाठी घेऊन जाणारे चारचाकी वाहन पकडले. 25 जानेवारी रोजी केलेल्या या कारवाईत सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय, आजिनाथ पाखरे व देवीदास कोकाटे या पोलिस पथकाने दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील पादरे पिओ, इंग्लिश मिडीअम स्कूलजवळ येथे छापा टाकला.

सदर ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये गोवंश जातीची एक जर्शी गाय व एक वासरुघेवून जात असताना आढळले. यावेळी पोलिस पथकाने 50 हजार रुपये किमतीचे वाहन व 20 हजार रुपये किमतीचे जनावरे असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस नाईक आजिनाथ महादेव पाखरे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक सुनील रामनाथ वाणी, (वय 27, रा. झरेकाठी, ता. संगमनेर) व हुसेन फकिर महंमद शेख (रा. ममदापूर, ता. राहाता) या दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button