केडगावात तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; कोतवाली पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा | पुढारी

केडगावात तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; कोतवाली पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा

नगर; पुढारी वृत्तसेवा : मित्राला भेटण्यास चाललेल्या तरुणाला रस्त्यात अडवून जातिवाचक शिवीगाळ करून कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. याबाबत विशाल मच्छिंद्र शिरवाळे (रा. काटवन खंडोबा, महात्मा फुले वसाहत) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संग्राम गिते (रा. रभाजीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

विशाल हा सोमवारी (दि.22) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मित्र रोहिते कोल्हे आणि आशू भिंगारदिवे यांनी भेटण्यासाठी जात होता. दुचाकीवरून जात असताना संग्राम गिते याने दुचाकी आडवी लावून अडविले. तू सातपुतेंच्या पोरांमध्ये का राहतो, असे म्हणून त्याने जातिवाचक शिवीगाळ केली व कमरेला असलेल्या कोयत्याने डोक्यावर वार केला. विशाल याने वार हुकवण्याचा प्रयत्न केला असता कोयता डाव्या तळहाताला लागून दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button