शिलेगावात तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न | पुढारी

शिलेगावात तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडी दांडा मारून रवींद्र म्हसे या तरूणाला गंभीर जखमी करण्यात आले. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे (दि. 19) घडली. घडलेल्या घटनेपासून रवींद्र म्हसे हा तरूण बेशुध्द अवस्थेत आहे. त्याच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील महादेव मंदिरा जवळ सप्ताहचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा रात्री नऊ वाजे दरम्यान जेवणाच्या पंगती चालू असताना रवींद्र प्रभाकर म्हसे हा जेवण करीत होता. त्यावेळी आरोपी सौरभ तागड याने रवींद्र प्रभाकर म्हसे याच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडला.

त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले. गेल्या पाच दिवसांपासून तो बेशुद्ध अवस्थेत असून डॉक्टर त्याला वाचवीण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सुमन प्रभाकर म्हसे (वय 45,रा. शिलेगाव, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ भाऊसाहेब तागड (रा. शिलेगाव, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुरीमध्ये हाणार्‍याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Back to top button