तळेगाव दिघे येथून ट्रॅक्टर चोरीस; सलग दुसरी घटना | पुढारी

तळेगाव दिघे येथून ट्रॅक्टर चोरीस; सलग दुसरी घटना

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा :  राहाता तालुक्यातील यादवमळा परिसरात घराच्या अंगणातील उभा केलेला ट्रॅक्टर चोरीस गेल्याची घटना 15 दिवसांपूर्वी घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दरम्यान, अगदी याच पद्धतीने संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात रात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात उभ्या केलेला साडेचार लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची चोरी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

तळेगाव दिघे शिवारात जनाबाई सुंदर दिघे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एम एच 17 सी आर 8996) सह रोटर घराच्या अंगणात उभा केला होता, परंतु सकाळी अंगणात ट्रॅक्टर न आढळल्याने दिघे कुटुंबियांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला, मात्र ट्रॅक्टर न मिळाल्याने याप्रकरणी राहुल सुंदर दिघे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. दुचाकींसह कारनंतर आता थेट ट्रॅक्टरची चोरी झाल्याचे अजब प्रकार घडत आहेत.

Back to top button