पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची धूळवड राज्यभर जोमात सुरू आहे. कोणाचे किती उमेदवार आले यांची उत्सुकता तमाम जनतेला आहे. आताही अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकलाबाई पवार या निळवंडे गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. विखे यांच्या समर्थक असलेल्या शशिकला या अपक्ष म्हणून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या.
त्या भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे. पण अजून त्यांच्याकडून कोणतीही घोषणा झाली नाही. राज्यातील ७७५१ ग्रामपंचयातीसाठी १८ डिसेंबरला मतदान झालं होतं. आज त्याचा निकाल समोर आला आहे.