संगमनेर : 37 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान | पुढारी

संगमनेर : 37 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणर्‍या घुलेवाडी, निमोण, तळेगाव, जोर्वे, कोल्हेवाडी, निमगाव जाळी, धांदरफळ अंभोरेसह 37 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 93 तर सदस्य पदाच्या 367 जागेसाठी 666 उमेदवारांसाठी सरासरी 41 हजार 765 पुरुषांनी तर 37 हजार 153 महिलांनी असा एकूण 78 हजार 918 मतदा रांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. सरासरी 80 टक्के मतदान झाले.  संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचाय तीसाठी सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेआबाळा साहेब थोरात यांच्यासह त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात व कन्या जयश्री थोरात- जैन या कुटुंबियांनी शिर्डी मतदार संघातील जोर्वे या गावी जात आपला मतदानाचा हक्क बजाविला त्यानंतरसर्व ठिकाणी सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली.

अतिसंवेदनशील असलेल्या निमोण, तळेगाव, धांदरफळ, जोर्वे, निमगाव जाळी आणि अंभोरे या महत्त्वाच्या ग्राम पंचायतींसह मोठे असलेल्या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दोन गटांमध्येच खर्‍या अर्थाने तुल्यबळ लढती होत अस ल्यामुळे दोन्ही गटाचे उमेदवार जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. यावेळी किरकोळ बाचाबाची वगळता प्रत्येकजण आपापल्या परीने प्रत्येकाला मतदान करण्याचा आग्रह करत होता.

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणार्‍या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असणार्‍या तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गणपत म्हातारबा दिघे (वय 100 व चंद्रभागाबाई गणपत दिघे (वय 90) या दापत्याने गाडीतून येऊन त्यांची तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मतदान केंद्रात मतदान केले. संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या तळेगाव दिघे येथे मतदान केंद्रामध्ये उमेदवारांच्या दोन गटामध्ये तसेच निमोण मतदान केंद्राच्या बाहेर आमचा उमेदवार पळविला. या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक व हमरी तुमरी झाली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पिठाळून लावले.

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या निमोण घुलेवाडी, धांदरफळ, निमगाव जाळी, कोल्हेवाडी, जोर्वे तसेच साकूर या मोठ्या ग्रामपंचायतसाठी खालील प्रमाणे मतदान झाले. ग्रामपंचायत साकुरच्या 6 प्रभागासाठी 5 हजार 327 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 81 टक्के मतदान झाले. जांभूळवाडी ग्रामपंचायतीच्या 3 प्रभागा साठी 2 हजार 276 मतदारांपैकी 1 हजार 964 मतदा रांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 86टक्के मतदानझाले. जांबूत ग्रामपंचायतीच्या 2 हजार 069 मतदारांपैकी 1 हजार 740 मतदारांनी मतदान केले असून 84 टक्के मतदान झाले.

रणखांब ग्रामपंचायतीच्या 3 प्रभागाच्या 1254 पैकी 1067 मतदारांनी मत दानाचा हक्क बजावला असून एकूण 85 टक्के मतदान झाले. वाघापूर ग्रामपंचायतच्या 1189 मतदारांपैकी 1026 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

थोरात क्रीडा संकुलात मतमोजणी

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर नगर पालिकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुलनाच्या बॅडमिंटन हॉल या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी दिली.

Back to top button