अकोलेतील शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना जळक्‍या लाकडयाने अधीक्षकाने केली मारहाण | पुढारी

अकोलेतील शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना जळक्‍या लाकडयाने अधीक्षकाने केली मारहाण

अकोले, पुढारी वृत्तसेवा : शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईक यांनी जळती लाकडे हातात घेऊन मारहाण केली आहे. या घटनेची आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेऊन अधिक्षक अश्विन पाईक यांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री ना.विजयकुमार गावित यांच्या कडे केली आहे. .

अकोले तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांना कचरा जमा केला होता. तो मुलांनी पेटविला होता. मात्र काही शिल्लक राहिल्याने उर्वरीत संध्याकाळी पेटवा असे म्हणून मुले शाळेत गेले होते. त्यानंतर उर्वरीत लाकडे मुलांना पेटवून जाळ केला होता. हा प्रकार तेथे आलेल्या अधिक्षक अश्विन पाईक यांनी पाहिला. मुले जाळाजवळ शेकत असताना पाईक आले आणि त्यांनी जळती लाकडे हातात घेऊन मुलांना मारण्यास सुरूवात केली. इयत्ता ६ वे ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना संबंधित व्यक्तीने जळत्या लाकडाने मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, हा सर्व प्रकार जेव्हा मुलांनी आपल्या पालकांना सांगितला. त्‍यानंतर पालकांनी जखमा पाहून तात्‍काळ मुलांना राजूर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी नेले. या घटनेची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांना समजतात ते राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्‍यांनी संबंधीत प्रकरणाची विद्यार्थ्यांकडून चौकशी करत आधार दिला. तात्काळ आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी भवारी यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

अधीक्षक पाईक यांनी जळत्‍या लाकडे मारहाण केल्‍याने त्‍याचावर कारवाई करून निलंबित करावे अशी सूचना केली आहे. तर अशोक संतोष धादवड वय १२, ओमकार भिमा बांबळे वय १४, दत्ता सोमनाथ धादवड वय १४, युवराज भाऊ धादवड वय १५, गणेश लक्ष्मण भांगरे वय १५ या विद्यार्थ्यांना अधीक्षक यांनी मारहाण केली आहे.

अकोले तालुक्यातील शिरपूजे शासकीय आश्रम शाळेमध्ये सहा विद्यार्थ्यांना मारहाण झाल्या प्रकरणी समक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली असता विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु याबाबत प्रकल्प अधिकारी भवारी यांच्या संगे अधिक्षक पाईक यांना निलंबित करण्याची केली.

– आ. डॉ. किरण लहामटे

.हेही वाचा 

सातार्‍यात ‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा

बेळगाव : सौंदत्ती येथे रेणुका देवीच्या यात्रेसाठी प्रशासन सज्ज

हिंगोली : हिंदू संघटनांचा वसमत येथे मूक मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग, शहर कडकडीत बंद

Back to top button