टाकळीभान : ट्रकला दुचाकीची धडक; दोघे तरुण ठार | पुढारी

टाकळीभान : ट्रकला दुचाकीची धडक; दोघे तरुण ठार

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  उसाच्या नादुरूस्त उभ्या ट्रकला मागच्या बाजुने दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे तरूण जागीच ठार झाले. ही दुर्घटना बुधवार (दि. 30) रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील खोकर फाटा परिसरात अन्नपुर्णा मंगल कार्यालयासमोर घडली. योगेश राजू ससाणे (वय 20 वर्षे, रा. श्रीरामपूर, वार्ड, क्र. 3 व योगेश अशोक यादव वय 21 वर्षे, रा. मुकुंदपूर,नेवासा फाटा) अशी दुचाकीवरील मृत तरूणांची नावे आहेत.

श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्गावर खोकर फाटा परिसरात अन्नपूर्णा मंगल कार्यालयासमोर (एम एच 18 एम 8962) क्रमांकाचाट्रक नादुरूस्त असल्याने रस्त्यावर उभा होता. या ट्रकला दुचाकी (क्रमांक एम एच 17 सी यु 3284) ची मागून धडक बसल्याने दुचाकीवरील योगेश राजू ससाणे व योगेश अशोक यादव नेवासा येथून श्रीरामपूरकडे दुचाकीवरून जात असताना खोकर फाटा परिसरात उसाच्या उभ्या ट्रकला त्यांची दुचाकी पाठिमागून धडकल्याने अपघात घडला.

धडक एवढी जोराची होती की, त्यात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळतात श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह श्रीरामपुरला हलवून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली. दोन तरुणांच्या अपघाती मृत्युमुळे हळ-हळ व्यक्त होत आहे.

Back to top button