वाकोडी शाळा शैक्षणिक रोल मॉडेल ! | पुढारी

वाकोडी शाळा शैक्षणिक रोल मॉडेल !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ज्याठिकाणी गाव, शाळा व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असतो, तिथे खरी गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण होते. वाकोडीतही शिक्षक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जिल्ह्यात वाकोडी शाळा ही एक शैक्षणिक रोडमॉडेल म्हणून पुढे आल्याचे गौरवोद्गार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले. नगर तालुक्यातील मॉडेल स्कूल वाकोडी जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डीले होते.

व्यासपीठावर लेखाधिकारी रमेश कासार, गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, चंद्रकांत सोनार, निर्मला साठे, सरपंच मंगलाताई गवळी, उपसरपंच आदिनाथ मोढवे, ग्रामसेवक सदस्य दिपिका कराळे, विशाल गागरे, शारदा पवार, अमोल तोडमल, परिघा राहींज, सोसायटी चेअरमन बच्चू मोढवे, अमोल महाराज, हौशाबापू गवळी, शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, संचालक महेश भणभणे, सूर्यकांत काळे, संतोष राऊत, कारभारी बाबर, रामेश्वर चोपडे, निर्गुणा बांगर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक बापू तांबे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, वाकोडी ग्रामस्थांनी शाळेला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळण्याची तळमळ असते. यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य सदैव मदतीला तयार असतात. त्यामुळेच याठिकाणी एक आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षिका निलीमा कदम यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष निवड संजय पवार, नियोजन नितीन पंडीत, सूत्रसंचालन अनिल शिंदे व श्रीनिवास, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु गवळी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे, जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, इब्टाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, संतोष दुसुंगे, नवनाथ तोडमल, सुयोग पवार, बाबा पवार, संजय दळवी, बाबासाहेब आव्हाड, विकास मंडळाचे विश्वस्त राजेंद्र निमसे, सचिव संतोष मगर, प्रल्हाद भालेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.

मुलांना संगणकाचेही धडे मिळावेत : कर्डिले

वाकोडी शाळा दर्जेदार शिक्षणामुळे आदर्श बनली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून येथे चांगल्या सुविधा आहेत. आता शाळेसाठी एक खोली मिळाल्यास ग्रामपंचायतीमार्फत तिथे संगणक लॅब होऊन मुलांना संगणकाचेही धडे मिळतील, असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी केले.

 

Back to top button